maharashtra

एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न


एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 ते 5 डिसेंबर दरम्यान राधिका टॉकीज जवळील एचडीएफसी बँक सातारा सिटी शाखेमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून बँकेतील कॅश केबिनची काच फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची फिर्याद बँकेचे शाखा व्यवस्थापक निलेश मोहन इंगळे राहणार शाहूनगर, गोडोली यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.