खा. शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी सिने अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता तिच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात याच प्रकरणावरुन एफआयआर’ दाखल झाला आहे.
सातारा : खा. शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी सिने अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता तिच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात याच प्रकरणावरुन एफआयआर’ दाखल झाला आहे. सातारा राष्ट्रवादी पक्षाच्या महिलेकडून ही तक्रार देण्यात आली असून केतकी सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे.
समींद्रा बापूराव जाधव (वय 43, रा. कोंडवे ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष आहेत.
समींद्रा जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 14 रोजी त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनामध्ये असता त्यांना सोशल मिडीयावरील ट्टिटरवर खा.शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केले असल्याचे समजले. त्यांनी त्याबाबत खातरजमा केली असता खा.शरद पवार यांच्या विषयी बदनामी केली अससल्याचे दिसून आले. त्या पोस्टमुळे वेगवेगळ्या जाती धर्मात, प्रादेशिक गटात, समाजात तेढ निर्माण होवून सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे तिच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन केतकी चितळे हिच्यावर रविवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


