maharashtra

सातारा येथील महिलेची ३२ हजार रुपयांची फसवणूक


Fraud of Rs 32,000 from a woman in Satara
३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन त्याच्या बदल्यात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन सातारा येथील एका महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन त्याच्या बदल्यात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन सातारा येथील एका महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड ते पोवईनाका जाणाऱ्या मार्गावर तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या कॉर्नर जवळील एका शेडमध्ये पद्मा सुनील शिंदे वय ५२, रा. वेळेकामठी, ता. सातारा यांच्याकडून दोन अज्ञात इसमांनी ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देऊन त्याच्या बदल्यात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन त्यांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.