maharashtra

नागेवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा


नागेवाडी येथील जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून एकावर कारवाई केली आहे.

सातारा : नागेवाडी येथील जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत चन्नाप्पा काशिनाथ जाहिरे रा. नागेवाडी, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्यांच्याकडून 560 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.