देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ कोल्हापूर येथे अभिष्टचिंतन केले.
सातारा : देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ कोल्हापूर येथे अभिष्टचिंतन केले. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंहांनी केलेल्या विकासकामांचे तोंडभरुन कौतुक केले. दरम्यान, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यपाल तसेच इतर मान्यवरांनी शुभेच्छा संदेश आणि दूरध्वनीवरुन खा. रणजितसिंहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. आज त्यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले असता माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्निक त्यांची भेट घेतली. योगायोगाने आजच खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस असल्याने अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांबद्दल खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे विशेष कौतुक केले. भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही अमित शहा यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली.
दरम्यान, आज खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस असल्याने माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषत: फलटण तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे. परंतू केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज कोल्हापूर दौरा असल्याने ते कोल्हापूरला त्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याने कालच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात तसेच फलटण शहरासह तालुक्यात रक्तदान शिबिर, फळ वाटप, ग्राम स्वच्छता अभियान, मंदिर स्वच्छता अभियान असे अनोखे व अभिनव उपक्रम राबवून खर्या अर्थाने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


