ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठे, तालुका वाई गावच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मर मधील सुमारे 1 लाख 8 हजार रुपये किमतीची तांब्याची तार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी दोन ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या बाबतची तक्रार आशिष गोपाल कृष्णन वय 42 राहणार सीबीडी कॉम्प्लेक्स तालुका वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.


