maharashtra

कोडोली येथे एकाला मारहाण करून सतराशे रुपये लांबवले


At Kodoli, one was beaten and seventeen hundred rupees was taken away
कोडोली, ता. सातारा येथे दोन अज्ञात इसमांनी एकाला दगडाने मारहाण करून त्याच्या खिशातून १ हजार ७०० रुपये चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कोडोली, ता. सातारा येथे दोन अज्ञात इसमांनी एकाला दगडाने मारहाण करून त्याच्या खिशातून १ हजार ७०० रुपये चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२७ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास कोडोली  येथील एका हॉटेल समोर विनायक आंधळे, वय ३०, रा. शाहूनगर, कडेगाव, जि. अहमदनगर हा इसम एका झाडाखाली बसलेला असताना त्याठिकाणी दोन अनोळखी इसम आले. त्यांनी तू कुठला आहेस असे विचारून त्याच्याशी वाद घालून त्याला दगडाने मारहाण केली. तसेच १ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेत दुचाकीवरून त्या दोन इसमांनी पलायन केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.