maharashtra

सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार

आम आदमी पार्टीचे विजय कुंभार आणि संदीप देसाई यांचे सातारा येथील पत्रकार परिषदेत प्रतिपादन

देशातील नऊ राज्यात आता आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्र राज्य आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची माहिती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार आणि पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : देशात अनेक राजकीय घडामोडी घडत असून भाजप जातीभेदाच्या भींती उभ्या करीत आहे. त्यांच्या या कुटील डावांमुळे सर्वसामान्य नाराज आहेत. देशातील नऊ राज्यात आता आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्र राज्य आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची माहिती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार आणि पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम आदमी पार्टीच्यावतीने पुणे व पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबिर सातार्‍यात आयोजित केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. भाजपबाबत सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. इतर राजकीय पक्षाची धोरणे वेगळी असून आप हा पक्ष दैंनदिन गरजांकडे लक्ष देणारा पक्ष आहे. भाजप बाबत सर्वसामान्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आप ने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियोजन बद्ध कार्यक्रम सुरू केले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आप लढवणार आहे. सातारा ही कर्मवीरांची भूमी असून याठिकाणी शिक्षणापासून अनेक जण वंचित आहेत. लोकांनी जर आप ला निवडले तर पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा देण्यावर भर दिला जाईल. शेतकर्‍यांचा प्रश्नासाठी आता आप रस्त्यावर उतरणार आहे. मतदार हा आमचा राजा आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मु-काश्मीर येथीलही निवडणूक आप लढवणार आहे. आप हा पक्ष आता भाजपला पर्याय म्हणून उभा राहत आहे. आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याकडे लोक भावी पंतप्रधानांच्या दृष्टिने पाहत आहेत. राजकीय पर्याय निर्माण करण्यासाठी संघटन गरजेचे आहे. आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात 1 कोटी सदस्य करण्याचे टार्गेट राज्यात आखले आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यांत सभासद नोंदणी सुरु आहे. या नोंदणीस नागरिकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या सगळ्याचे अहवाल दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत. आगामी काळात आम आदमी पार्टी हा सशक्त राजकीय पक्ष म्हणून उभा राहू शकतो.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, महाराष्ट्र राज्य सचिव धंनजय शिंदे, पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर, राज्य समिती सदस्य मुकूंद कीर्दत, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक ऍड. सागर पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, सचिव वसीम मुल्ला, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. एम. पाटील, सांगली जिल्हा पूर्व समन्वयक परमानंद भोसले, सांगली महानगरपालिका समन्वयक कृष्णा अलदार, सांगली जिल्हा पश्‍चिम समन्वयक राम पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, सचिव मारुती जानकर, प्रवक्ता निवृत्ती शिंदे, महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, रतन पाटील आणि बहुसंख्येने महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.