maharashtra

जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे


Crimes against five persons in the case of interrogation
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासूसह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातारा : विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासूसह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 मे 2021 ते दि. 9 जुलै 2022 दरम्यान माहेरहून सोन्याचे दागिने घेवून ये, असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करणार्‍या पती सोमनाथ ऋषमुख हंपे, सासू सुमन ऋषमुख हंपे, दीर सदाशिव ऋषमुख हंपे, नणंद संजीवनी व भाग्यश्री ऋषमुख हंपे सर्व रा. सच्चिदानंद बंगला, वनश्रीनगर, तळेगाव दाभाडे, पुणे यांच्याविरोधात सौ. ज्योति सोमनाथ हंपे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. हवा. गायकवाड करीत आहेत.