maharashtra

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शाही मशिदी समोर असलेल्या ॲनिमेशन क्लासला शहर परिसरात राहणाऱ्या दोन युवती गेल्या होत्या. त्यावेळी गोरख भरत जाधव रा. जाधव आळी, नागठाणे, ता. याने त्या ठिकाणी येऊन संबंधित मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व शिवीगाळ करीत दमदाटीही केली. याप्रकरणी जाधव याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक खलिफा करीत आहेत.