रिक्षाने दुचाकीला धडक देऊन अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : रिक्षाने दुचाकीला धडक देऊन अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२९ जुलै रोजी तीन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील करंजे नाका परिसरात सोमनाथ साळुंखे रा. नेले, ता. सातारा यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालवून दुचाकीला धडक देऊन जखमी केल्याची तक्रार अमित मधुकर ननावरे, रा. कोंडवे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.


