वडाचे म्हसवे, ता. जावली येथील सावंत कुटुंबीयांना काल रात्री पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सातारा : वडाचे म्हसवे, ता. जावली येथील सावंत कुटुंबीयांना काल रात्री पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, योगेश सावंत, रा वडाचे म्हसवे, ता. जावली हे रस्त्याच्या वादावरून कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी काल रात्री दिले होते. मात्र त्यांची तक्रार दाखल करून न घेता पोलीस निरीक्षक विकास शिंदे व चालक कांबळे यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी सावंत यांची सहा वर्षाची मुलगी त्यांच्या बचावासाठी पुढे आली असता तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप सावंत कुटुंबीयांनी केला आहे. विकास शिंदे आणि कांबळे या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचाही आरोप योगेश सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केला आहे. सावंत कुटुंबीयांना मारहाण केल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांना सोडून देण्यात आले.


