maharashtra

बंद स्टोअर रूममधून मीटर व तांब्याच्या तारांची चोरी


वाई. ता, वाई येथील धोम- बलकवडी प्रकल्पाच्या बंद स्टोअर रूममधून अज्ञात चोरट्याने मीटर व तांब्याच्या तारा चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : वाई. ता, वाई येथील धोम- बलकवडी प्रकल्पाच्या बंद स्टोअर रूममधून अज्ञात चोरट्याने मीटर व तांब्याच्या तारा चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ डिसेंबर २०२२ ते दि. १६ जानेवारी २०२३ दरम्यान वाई येथील धोम-बलकवडी प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचच्या बंद स्टोअर रूमला असलेली बंद खिडकी उघडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने २३ हजार १०० रुपये किमतीचे मीटर व तांब्याच्या तारा चोरून नेल्याची तक्रार असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर आत्माराम गोविंद नवसे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.