maharashtra

जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी निवड


Jayakumar Shinde elected as Satara District General Secretary of Bharatiya Janata Party
माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.
सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघटनात्मक काही बदल व पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने नवीन निवडी करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक जयकुमार शिंदे हे जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करत होते. परंतु संघटनेच्या कामाच्या दृष्टीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीने त्यांना आमदार तथा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या कोअर टीम मध्ये काम करण्यासाठी त्यांची सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात येत आहे, असे जाहीर केले व तसे निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
फलटण तालुक्यामध्ये जयकुमार शिंदे यांचे संघटनात्मक दृष्टीने काम हे अतिशय चांगले असल्याने त्यांनाही बढती देण्यात आली आह. त्यांचा सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांच्याशी घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंध आहेत व पक्ष संघटनेसाठी ते वेळ देऊन काम करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष वाढीची जबाबदारी आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता जिल्ह्याच्या दृष्टीने जयकुमार शिंदे यांची निवड ही योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व सर्वच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जयकुमार शिंदे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी भाजपच्या केंद्रीय व राज्यातील अनेक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. अजुन काम करून भाजपला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
जयकुमार शिंदे यांच्या निवडीने संघटनेला नक्कीच बळ निर्माण होईल. याबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, संघटक महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, युवा नेते अतुल भोसले, जिल्हा प्रभारी विक्रम पावसकर, माजी अध्यक्ष भरत पाटील, पिंपरी चिंचवड प्राधिकरण चे माजी अध्यक्ष सदाशिव भाऊ खाडे, संघटक सरचिटणीस शेखर वढणे, भरत मुळे, विठ्ठल बलशेटवार, नंदकुमार डुबल, अनिरुद्ध गावडे, सुरेश निंबाळकर व जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.