maharashtra

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्जुन यशवंत कुंभार याला 19 एप्रिल 2022 पासून एक वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश झाला आहे. मात्र कुंभार हा 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हद्दपार आदेशाचे उल्लंघन करीत कराड शहरात आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.