maharashtra

सोनगीर वाडी येथून टेम्पोची चोरी


सोनगीर वाडी, तालुका वाई येथून टेम्पोची चोरी झाल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : सोनगीर वाडी, तालुका वाई येथून टेम्पोची चोरी झाल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता ते दिनांक 22 ऑगस्ट रोजी च्या सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सोनगीर वाडी, वाई, तालुका वाई येथील धुमाळ वजन काटा नावाच्या दुकानासमोर लावलेला 10 लाख 50 हजार रुपये किमतीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक एमएच 12 एचडी ४१७१) चोरून नेला असल्याची फिर्याद कीर्तीकुमार मोहनलाल ओसवाल (वय 34, राहणार गणपती आळी, वाई, तालुका वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.