maharashtra

खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्याला 79 पोलिसांचा बंदोबस्त...!!

पाली गावात 144 कलम लागू

79 police escort to Khandoba- Mhalsa wedding ceremony ... !!
महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड पालीच्या खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी संपन्न झाले.

कराड : महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड पालीच्या खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी संपन्न झाले. पाली गावात 144 कलम लागू करण्यात आले असून बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली. पाली गावात 10 अधिकारी आणि 69 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.
कराड तालुक्यातील पाली येथे आज खंडोबा देवाच्या यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आज शनिवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी गावात पाहणी केली. तसेच पाली गावात येणाऱ्या मुख्य मार्गावरील काशिळ, तारळे, इंदोली यासह प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी पाली गावात येणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली गावात खंडोबा देवाची यात्रा रद्द झाल्याने गावात शुकशुकाट जाणवत आहे. दरवर्षी 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत पालीची यात्रा पार पडत असते. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने पोलिस बंदोबस्तात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत यात्रेचा सोहळा पार पडला आहे...!!