येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील एका पतसंस्थेसमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील एका पतसंस्थेसमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जानेवारी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील तहसीलदार कार्यालय परिसरात असणाऱ्या ज्ञानदीप पतसंस्थेसमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.५० एएफ ४७५४ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार आनंद बाळकृष्ण सोनवणे, रा. खंडोबाचा माळ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


