दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रशांत शशिकांत जगताप वय 24, रा. अतीत, ता. सातारा हा त्याचा मित्र तेजस राजन कारंडे यांच्याबरोबर गावदेवची मिरवणूक पाहण्यासाठी गेले असताना तेथीलच विक्रम अधिक यादव याने या दोघांवर चाकू सारख्या धारदार हत्यारांनी हल्ला करीत त्यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले आहे. याबाबत विक्रम यादव याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास एपीआय तेलतुंबडे करीत आहेत.


