maharashtra

फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा


जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे योजनेतून सबसिडीसह बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगून ३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे योजनेतून सबसिडीसह बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगून ३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै २०२१ पासून सातारा येथील विसावा नाका येथील एका कार्यालयात चंद्रकांत बापू कोळपे वय २९, रा‌. संगममाहुली, ता. सातारा आणि अमोल बबन साळुंखे वय ४२, रा. चोरे धावरवाडी, ता. कराड  यांनी सौ. वनिता नितीन साळुंखे रा. कामथी, ता. सातारा या महिलेसह अन्य एकाचा विश्वास संपादन करून जिल्हा उद्योग केंद्रातून ५ लाख रुपयांचे कर्ज व अण्णाभाऊ साठे योजनेतून १० लाख रुपये सबसिडीसह बिनव्याजी कर्ज प्रकरण मंजूर करून देतो असे सांगून ३ लाख ४३ हजार रुपये घेऊन अद्याप पर्यंत कोणतेही कर्ज प्रकरण मंजूर न करता दिलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.