maharashtra

गोडोली येथून दुचाकीची चोरी


गोडोली येथून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : गोडोली येथून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहा डिसेंबरच्या रात्री ऋषिकेश रमेश लोखंडे राहणार गोडोली, तालुका सातारा यांचे अपार्टमेंट च्या पार्किंग मधून एक्टिवा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच 11 एई 3861 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.