maharashtra

संशयितरित्या दुचाकी बाळगणाऱ्या एकावर गुन्हा


Crime on one of the suspects
संशयितरित्या दुचाकी बाळगणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : संशयितरित्या दुचाकी बाळगणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ जुलै रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठेतील प्रकाश लॉजच्या समोर, आकाश संतोष अवघडे, रा. मंगळवार पेठ, सातारा हा संशयितरित्या दुचाकी बाळगताना आढळून आला. त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याला कोणतेही स्पष्टीकरण न देता आल्याने पोलीस नाईक अविनाश चव्हाण यांनी त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.