येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढेफाटा या सेवा रस्त्यावरुन जात असताना खेड गावच्या हद्दीत कॅनॉलजवळ दुचाकीच्या चाकात साडी अडकून महिला खाली पडली. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना दि. २४ रोजी दुपारी ५.३० च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढेफाटा या सेवा रस्त्यावरुन जात असताना खेड गावच्या हद्दीत कॅनॉलजवळ दुचाकीच्या चाकात साडी अडकून महिला खाली पडली. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना दि. २४ रोजी दुपारी ५.३० च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. सुगंधा सुरेंद्रन (वय ४४, सध्या रा. सातारा, मूळ रा. केरळ) यांचा मृत्यू झाला आहे. त्या पतीच्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


