जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन चौघे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन चौघे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 मी रोजी तीन वाजण्याच्या सुमारास बोरखळ येथून राहत्या घरातून निकिता शशिकांत रसाळ, वय 25 ही युवती घरात कोणास काहीही न सांगता निघून गेली असल्याची सत्ता करा मोहन शशिकांत रसाळ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दुसर्या घटनेत, दि. 27 मे रोजी 12 धनगरवाडी येथील संदीप मधुकर गायकवाड, वय 40 हे पुण्याला कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले आहेत. त्यांचा पाहुण्यांकडे शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत अशी तक्रार स्वप्नाली संदीप गायकवाड यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तिसर्या घटनेत, दि.25 मे रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास दहिवडी येथील बस स्थानक परिसरातून ऋतुजा अनिलकुमार काशीद, वय् 23, रा. दहिवडी ही युवती बारामती येथे कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली आहे तिचा शोध घेतला असता अद्याप ती मिळून आली नसल्याची तक्रार अनिलकुमार काशीद यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
चौथ्या घटनेत, दि. 26 रोजी 9.30 वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथील नौशाद मेहमूद इनामदार, वय 30 ही महिला तिची मोठी मुलगी सुमीरा हिला माझा हात दुखत आहे मी दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नसल्याची तक्रार मेहमूद बाबू इनामदार यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे.


