येथील शाहुपुरी परिसरात असणाऱ्या साई कॉलनी येथून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करून सुमारे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील शाहुपुरी परिसरात असणाऱ्या साई कॉलनी येथून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करून सुमारे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३० मे रोजी ५ ते दि.३१ मे रोजी १२ वाजण्याच्या दरम्यान शाहूपुरी येथील साई कॉलनी येथे असणाऱ्या विक्रांत मारुती फडतरे यांच्या राहत्या बंद घराचे मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सुमारे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


