सार्वजनिक पिण्याच्या पाण्यावर उपसरपंचाने केले अतिक्रमण
ग्रामस्थांना पाण्याची तीव्र टंचाई
विवर ता. महाबळेश्वर येथील शासकीय पिण्याच्या पाण्यावर (उपसरपंच) अनिल विठृठल कदम, मारूती यशवंत कदम, धोंडीबा यशवंत कदम, दगडु लक्ष्'ण कदम, गुणाजी यशवंत कदम या इसमांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून ग्रामस्थांनी दि. 13/04/2023 रोजी सरपंच ग्रामपंचायत तळदेव यांना लेखी तक्रार
विवर ता. महाबळेश्वर येथील शासकीय पिण्याच्या पाण्यावर (उपसरपंच) अनिल विठृठल कदम, मारूती यशवंत कदम, धोंडीबा यशवंत कदम, दगडु लक्ष्'ण कदम, गुणाजी यशवंत कदम या इसमांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून ग्रामस्थांनी दि. 13/04/2023 रोजी सरपंच ग्रामपंचायत तळदेव यांना लेखी तक्रार केली होती. परंतु सरपंच यांनी ग्रामस्थांची कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नाही दखल घेतली नाही. त्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी मा. तहसिलदार महाबळेश्वर यांना लेखी तक्रार दि. 21/04/2023 रोजी केली असता अध्याप कुठलीही द'नकारी कार्यवाही नाही. ग्रामस्थांना तिव्र पाण्याची टंचाई आहे म्हणून विवर ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी यांनी दि 17/05/2023 रोजी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांनाही अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. तसेच ग्रामपंचायतीला पाठवनलेले पत्र हे कारवाईसाठी गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीने पुढील कारवाईसाठी पाठवायला पाहिजे होते व सदर योजनेवरील अतिक्रमण हे अधिग्रहण करा म्हणजेच अतिक्रमण काढून टाका अशा अशयाचे पत्र मा. तहसिलदार यांना जायला पाहिजे होते व तहसिलदार यांनी तसा अभिप्राय सर्कल तलाठी यांना दिले असते तर ग्रा'स्थांना वेळेत पाणी मिळाले असते असे ग्रामस्थांना समाधान वाटले असते. परंतु तसे काहीच झाले नाही व वरील उपसरपंच यास तीन अपत्य असताना सदर इसमाने शासनाची दिशाभूल करून निवडून आला आहे तरी वरील दोन्ही बाबीची शासनाने दखल घ्यावी असे ही विवर ग्रा'स्थांनी म्हटले आहे व आमच्या प्रतिनिधीनी विवर ग्रामस्थाशी संपर्क साधला असता अतिक्रमण व 3 अपत्य असताना उपसरपंच भूषविणे हे चुकीचे आहे असे विवर ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच जलजीवन मिशनचे काम हे गावमध्ये चालू आहे परंतु सदर कामाचे इस्टीमेन्ट एकीकडे व काम दुसरीकडे असे ग्रामस्थांचे म्हणणे असून इस्टीमेन्ट प्रमाणे काम होत नाही इस्टीमेन्टला 2 टाक्या प्लास्टर असताना सदर मक्तेदाराने 1 टाकी सुमारे 15000 लिटरची दुरूस्त केली आहे व 50 हजार लिटरच्या टाकीला फक्त सिमेंट पेंन्ट बाहेरून केले आहे व गोटा पाईप 1200 मीटर असता फक्त 600 मीटर नवीन वापरला आहे व सदर कामाचे शाखा अभियंता यांना ग्रामसभेत संपर्क साधला असता शाखा अभियंता यांनीही ग्रामस्थांना 600 मीटर गोटा आहे असे सांगितले व एकच टाकी रिपेअरींग आहे असे सांगितले व झरा टाकी कॉन्ट्रक्टर स्वखर्चाने बांधीत आहे असे ग्रामस्थांना सांगितले म्हणून ग्रामस्थांनी स्वत: इस्टीमेन्ट प्रत ग्रामीण पाणी पुरवठा मेढा यांचेकडून घेतली असता 1200 मीटर गोटा 300 मीटर जीआय पाईप व ओघळांच्या ठिकाणी एम 15 कॉक्रीट व टाकीला सुळुईवाल इत्यादी कामे असता काम अपुर्ण अवस्थेत आहे तसेच झरा टाक्या दोन्ही लिकेज असलेमुळे गावात पाणी नाही तरी गावात सुरळीत पाणी मिळावे म्हणून ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ताबडतोब शासकीय योजना राट्रीय ग्रामीण पेयजल या योजनेवरील अतिक्रमण हे ताबडतोब काढून टाकावे असे व जलजीवन मिशनचे चालु असलेले काम इस्टीमेन्ट प्रमाणे करण्यात यावे अशा आशयाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांनाही ग्रामस्थांनी दिले आहे तसेच मा. जिल्हाधिकारी यांनाही तशा प्रती दिल्या आहेत असे साहस वार्ता च्या प्रतिनिधींना विवर ग्रामस्थांनी बोलताना सांगितले व आमचे अर्जाची दखल कोणीही घेतली नाही तर आम्ही ग्रामस्थ उपोाणासारखा पर्याय निवडला जाईल असे ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.


