जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ रोजी १.४५ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या साई दर्शन कॉलनी येथून दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीझेड १०९० अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार ऋषिकेश अरुण खराडे रा. अजंठा कॉलनी, दिव्यानगरी, सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली. दुसऱ्या घटनेत दि.१० मे ते दि. ११ मे दरम्यान शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अक्षय पार्क सोसायटी बिल्डींगमधील पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच. ११ बीटी ६१३३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दत्तात्रय नारायण भरगुडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे.


