शाहूनगरमधील गुरुकूल शाळेच्या पाठीमागील शेतातील आंब्याच्या झाडाला युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.
सातारा : शाहूनगरमधील गुरुकूल शाळेच्या पाठीमागील शेतातील आंब्याच्या झाडाला युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केतन राजेंद्र जाधव (वय 30, रा. जोशीवाडा, गोडोली, सातारा) असे मृताचे नाव आहे. दि. 10 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास त्याने आत्महत्या केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रवीण जगन्नाथ साळुंखे (वय 37, रा. जोशीवाडा, गोडोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोहिते तपास करत आहेत.


