बनावट दस्तऐवज तयार करून अतिक्रमण केल्याप्रकरणी दिडवाघवाडी, ता. माण येथील पती-पत्नीवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बनावट दस्तऐवज तयार करून अतिक्रमण केल्याप्रकरणी दिडवाघवाडी, ता. माण येथील पती-पत्नीवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२ डिसेंबर २०२० रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास पळशी, ता. माण येथील गट क्रमांक १८९१ येथे तसेच प्रांत कार्यालय सातारा येथे सौ. नीलम बाळकृष्ण काळे, बाळकृष्ण किसन काळे दोघेही रा. दीडवाघवाडी, ता. माण या दांम्पत्याने नकाशाच्या आलेखात छेडछाड करून बनावट करून त्याची प्रत सातारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्जासोबत सादर करून अतिक्रमण केल्याची तक्रार शरद उत्तम सावंत रा. पळशी यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


