maharashtra

किसनवीर कारखान्याचे वाटोळे प्रस्थापित राजकारण्यांनी केले

बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप

The Kisanveer factory was destroyed by the established politicians
पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे राजकारणातील प्रस्थापित नेतृत्वांने केले आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर कसे काढावे याचे याची फेरमांडणी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल त्या त्याला आमचा पाठिंबा असेल वेळप्रसंगी शेतकऱ्यांची ताकद उभी करून आम्ही स्वतः तिसरे पॅनेल उभे करू असे प्रतिपादन बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

सातारा : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे राजकारणातील प्रस्थापित नेतृत्वांने केले आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर कसे काढावे याचे याची फेरमांडणी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल त्या त्याला आमचा पाठिंबा असेल वेळप्रसंगी शेतकऱ्यांची ताकद उभी करून आम्ही स्वतः तिसरे पॅनेल उभे करू असे प्रतिपादन बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
राज्यशासनाने एफआरपी ची जी रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे या धोरणाला विरोध करण्यासह शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता पन्नास हजार रुपये गेली दोन वर्षे मिळाला नाही या मागण्यांसाठी एक मेपासून बळीराजा शेतकरी संघटना सातारा व कराड येथे तीव्र स्वरूपाचे बेमुदत आंदोलन उभारणार असल्याची माहिती पंजाबराव पाटील यांनी दिली येथील शासकीय विश्रामगृहात पंजाबराव पाटील प्रदेशाध्यक्ष बी जी पाटील व जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव या वेळी उपस्थित होते
पंजाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत बळीराजा शेतकरी संघटनेची आगामी वाटचाल स्पष्ट केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वास पांडुरंग जाधव म्हणाले की, एफ आरपी साठी तीव्र लढा उभारावे लागणार आहे, कारखानदार काटमारी आहे यासाठी सीसीटीव्ही बसवावेत, वीज लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे.
पंजाबराव पाटील म्हणाले की करोनाच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान जाहिर केले पण मिळाले नाही. निवडणूक काळात केलेल्या घोषणा पाळल्या जात नाहीत.अजित पवार यांनीही सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे कर्जे माफ करू पण वास्तवात काहीच केलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी 1 मे रोजी कराड येथे आंदोलन करणार आहे.किसनवीर चे प्रस्थापित यांनी वाटोळे केलं आहे. यावर्षी ऊस अजूनही कार्यक्षेत्रात तसाच उभा आहे. आज मदन भोसले व मकरंद पाटील यांनी कारखान्याचे पूर्ण नुकसान केलं आहे पण शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांनी जर पॅनल उभं केलं तर त्याना पाठिंबा देणार आहोत व प्रचार ही त्यांचा करणार आहे. स्वाभिमानी ने पॅनल उभं केलं तर त्यानाही आम्ही पाठिंबा देऊया.
बी जी पाटील म्हणाले, "शेतकऱ्याला कर्ज देताना विचार होतो पण कारखानाला कर्ज देताना सढळ हस्ते दिले जाते. आज कर्जाचे प्रश्नवर बोलले तर नेतेमंडळींना बाहेर फिरता येणार नाही. सदाभाऊ खोत यांची आमदारकीची मुदत संपत आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांना आमदारकी, मंत्रिपद मिळालं पण आमच्या शेतकऱ्याचं किती कल्याण झालं हे आता सर्वाना कळलं आहे.