maharashtra

पांगरी येथे ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर


One killed, one seriously injured in truck and two-wheeler accident at Pangri
शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

सातारा : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
शिरवळ येथील एमआयडीसीत कामाला असलेले सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकीवरून (एमएच 11 डीसी 8927) निघाले होते. पांगरीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची ट्रकला (एमएच 12 एफ झेड 8977) जोरदार धडक झाली. यामध्ये जबर मार लागल्यामुळं सूर्यकांत याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश गंभीर जखमी झाला आहे. शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या सूर्यकांत जाधव याचा गेल्या दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.