maharashtra

जुन्या एमआयडीसीतून दुचाकीची चोरी


जुन्या एमआयडीसीतून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : जुन्या एमआयडीसीतून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जुन्या एमआयडीसीतील भोसले ट्रान्सपोर्ट येथे पार्क केलेली चंद्रकांत लक्ष्मण साळुंखे वय 35 राहणार मांडवे तालुका सातारा यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच 11 एएच 8543 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक सुतार करीत आहेत.