maharashtra

दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक


दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 डिसेंबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास कोडोली येथील पूजा विष्णू कांबळे यांना अनोळखी दोन इसमांनी गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र तुम्हाला साफ करून देतो, असे सांगून त्या पंचवीस हजार रुपये किमतीच्या मंगळसूत्राची चोरी केली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.