पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरती गोविंद जाधव रा. सोमवार पेठ, सातारा या विवाहितेने पती गोविंद हनुमंत जाधव यांच्यावर संशय घेत त्यांना शिवीगाळ करून, काठीने मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी देत घरातील जिन्यातून खाली ढकलून दिले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून महिला पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.


