maharashtra

हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one for violating deportation order
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अर्जुन नागराज गोसावी, वय ३६, रा. सैदापूर, ता. सातारा असे त्याचे नाव आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अर्जुन नागराज गोसावी, वय ३६, रा. सैदापूर, ता. सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ५ मार्च २०२१ रोजी अर्जुन गोसावी याला दोन वर्षाच्या कालावधीसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केल्याचा आदेश पारित केला होता असे असतानाही त्या आदेशाचा भंग करून तो सातारा येथे आढळून आल्याने त्याच्याविरोधात पोलीस हवालदार दादासाहेब परिहार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गोसावी  याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.