छोटा हत्ती टेम्पो पाठीमागे घेताना एकाला धडक देऊन जखमी केल्याने चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : छोटा हत्ती टेम्पो पाठीमागे घेताना एकाला धडक देऊन जखमी केल्याने चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.९ मे २०२२ रोजी बोरखळ, ता. सातारा गावच्या हद्दीत प्रदीप बनसोडे, रा. वनवासवाडी, ता. सातारा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम.एच. ११ एजी २३६१ पाठीमागे घेत असताना दत्तात्रय गायकवाड रा. बोरखळ, ता. सातारा यांना टेम्पोने धडक देऊन जखमी केले. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याची तक्रार परशुराम दत्तात्रय गायकवाड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


