maharashtra

अवैध ताडीप्रकरणी एकावर कारवाई


अवैध ताडीप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

सातारा : अवैध ताडीप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे पोलिसांनी ताडी प्रकरणी कारवाई करुन राजेंद्र सिधप्पा गुत्तेदार (रा.सदरबझार) याच्यावर गुन्हा दाखल केला. संशयिताकडून पोलिसांनी 600 रुपये किंमतीची 10 लिटर ताडी जप्त केली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.