maharashtra

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार


Woman tortured by threatening to make photo viral
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल विजय मराठे, वय २७, रा. पसरणी, ता. वाई  याच्या विरोधात पोलीस पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाई : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल विजय मराठे, वय २७, रा. पसरणी, ता. वाई  याच्या विरोधात पोलीस पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९  नोव्हेंबर २०२० ते दि. १९ डिसेंबर २०२१ अखेर सुरुर, ता. वाई येथील राजगड लॉज व त्यानंतर महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर  येथील हॉटेल योगी येथे नवी मुंबई येथील एका महिलेवर अमोल विजय मराठे याने फोटो व्हायरल करतो अशी भीती दाखवत जीवे मारून टाकण्याची अशी धमकी देत शिवीगाळ मारहाण केल्याची तक्रार भुईंज येथील पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दाखल केली. अमोल मराठे याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.