maharashtra

जिल्हा रुग्णालयासमोर जबरी चोरी


Robbery in front of District Hospital
येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोरून एका महिलेच्या हातातील पर्स हिसकावून घेऊन त्यातील १३ हजार रुपये किमतीचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी एका अज्ञात इसमावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोरून एका महिलेच्या हातातील पर्स हिसकावून घेऊन त्यातील १३ हजार रुपये किमतीचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी एका अज्ञात इसमावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ मार्च रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या राहत्या घराच्या गेटसमोरून तेथीलच वंदना राजेंद्र बगाडे ही महिला जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यातील १३ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.