आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हास्यास्पद
पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडून येण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यस्पद आहे. त्यांची खूपच तयारी असेल तर त्यांनी पाटण मतदारसंघातून येऊन निवडून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार शंभूराज यांनी दिले.
सातारा : ज्यांच्या मागे 50 आमदार व तेरा खासदार आहेत, त्यांना कोणीही उठावे आणि आव्हानं देण्याची भाषा करावी. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडून येण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यस्पद आहे. त्यांची खूपच तयारी असेल तर त्यांनी पाटण मतदारसंघातून येऊन निवडून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार शंभूराज यांनी दिले.
साताऱ्यात शंभूराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना आव्हान- प्रति आव्हानाच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळी मतदारसंघाचा राजीनामा देतो. तेथून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होते. या आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजेसाई यांनी साताऱ्यात चांगलाच समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे तेरा खासदार आणि पन्नास आमदारांचे पाठबळ आहे. या पाठबळावरच बाळासाहेबांची शिवसेना दमदारपणे सत्तेमध्ये वाटचाल करत आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यास्पद आहे. आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दोन आमदार च्या विधान परिषदेवर निवडून द्यावे लागले. शिंदे साहेब लांब राहू देत, आम्ही कार्यकर्ते आहोत त्यांचा समाचार घ्यायला. पुन्हा निवडणूक त्यांना जर लढवायची असेल तर त्यांनी पाटण मध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवून दाखवावी. आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात. त्यांनी टीका करताना राजकीय विधानांचे भान ठेवावे. त्यांच्या आमदारकीसाठी आमदार सुनील शिंदे यांचे तिकीट कट करावे लागले. सुनील शिंदे व सचिन अहिर यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. त्यामुळे आपण काय बोलतो आहोत, याचा विचार करूनच त्यांनी विधाने करावीत, अशी जोरदार टीका शंभूराज देसाई यांनी केली.


