सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास व्यंकटपुरा पेठ, सातारा येथून ओंकार मुकुंद डंबे यांची घरासमोर पार्क केलेली होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीएल 8511 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


