जुन्या भांडणाच्या कारणातून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे सोनगाव येथील एकाला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे सोनगाव येथील एकाला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जानेवारी रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास सोनगाव, ता. सातारा येथील साकेत माधव सावंत, वय २५ हा सातारा येथून सोनगावकडे जात असताना क्षेत्रमाहुली येथे तेथीलच संदीप सावंत यांनी जुन्या भांडणाच्या कारणातून त्याला अडवून त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


