maharashtra

सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास रोहित राजा शेलार वय 33 रा. शहापूर ता. कराड हा मादक पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करीत होता. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.