maharashtra

वायरमन डांभावर चढला अन्‌ एकाने डीपी सुरू केला


लिंब (ता.सातारा) गावच्या हद्दीतील खंडोबा नगर (नवीन गावठाण) नावाच्या शिवारात महावितरणची सर्व्हीस केबल जळाली होती. जळालेली केबल दुरूस्त करण्यासाठी डीपी बंद करून खांबावर वायरमन चढलेला असताना डीपी सुरू केल्याने पोपट नारायण सोनमळे (रा.लिंब,ता.सातारा) याच्यावर वायरमन अभिजीत संजय भोसले (रा.गोवे,ता.सातारा) यांच्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : लिंब (ता.सातारा) गावच्या हद्दीतील खंडोबा नगर (नवीन गावठाण) नावाच्या शिवारात महावितरणची सर्व्हीस केबल जळाली होती. जळालेली केबल दुरूस्त करण्यासाठी डीपी बंद करून खांबावर वायरमन चढलेला असताना डीपी सुरू केल्याने पोपट नारायण सोनमळे (रा.लिंब,ता.सातारा) याच्यावर वायरमन अभिजीत संजय भोसले (रा.गोवे,ता.सातारा) यांच्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, लिंब गावच्या हद्दीत असलेल्या खंडोबा नगर परिसरातील एका खांबावर असलेली सर्व्हिस केबल जळाली होती. त्यामुळे वायरमन भोसले हे दि.29 रोजी जळालेली केबल दुरूस्त करण्यासाठी डीपी बंद करून खांबावर चढले होते. दरम्यान पोपट सोनमळे याने भोसले यांनी बंद केलेला डीपी अचानक सुरू केल्याने विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भोसले यांना विजेचा धक्का बसून ते जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बागवान करत आहेत.