तलवार घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी एकावर पुसेगाव पोलीस ठाण्यात खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : तलवार घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी एकावर पुसेगाव पोलीस ठाण्यात खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २४ जुलै रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खटाव गावातील जुना एसटी स्टँड लगत असणाऱ्या शेत जमिनीमध्ये अरविंद शांताराम ईगावे वय 79 हे जमिनीतील झाडे तोडत असताना महेंद्र कृष्णराव देशमुख राहणार खटाव तालुका खटाव हा तलवार हातात घेऊन तेथे आला. त्याने सदरची जमीन आमची आहे, त्यातील झाडे तोडू नका, असे म्हणून ईगावे यांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली. याबाबतची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस हवालदार एस. एस. भोसले तपास करीत आहेत.


