येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ९०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ९०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती सातारा येथील चांदणी चौकात असणाऱ्या राजधानी टॉवर्सच्या जवळ पाटील वडेवाले शॉपच्या आडोशाला सुभाष बाळू गिरी वय ५९, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा आणि चंद्रमणी आगाने हे दोघे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून ३ हजार ९०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


