maharashtra

4 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा


4 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : 4 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 जून 2021 ते 16 ऑक्टोबर 2021 दरम्यान राजेंद्र बापूराव भोसले रा. खर्शी, ता. जावली यांना शरयु ऍग्रो लिमिटेड, कापशी, ता. फलटण आणि जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव, ता. कोरेगाव या दोन्ही साखर कारखान्यांसाठी बारा ऊसतोड मजूर देतो, असे सांगून बाळू भिवा हिलम आणि परशुराम पांडुरंग हिलम दोघेही राहणार ताडगाव, पोस्ट महागाव, ता. सुधागड, जिल्हा रायगड यांनी 4 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याबाबतची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मुंगसे करीत आहेत.