maharashtra

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक पाच मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जितेंद्र एकनाथ जाधव राहणार कुसुर तालुका फलटण हे बाळू पाटलाची वाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत असलेल्या थोरात फॅब्रिकेशन या दुकानात अमोल शेळके व अक्षय खताळ यांच्यासोबत बसले असताना टिलु उर्फ तुषार नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ, नामदेव गणपत धुमाळ सर्व रा. मिरेवाडी ता. फलटण तसेच इतर अनोळखी नऊजण तेथे आले व त्यातील टिल्लू धुमाळ याने हातातील तलवारीने जितेंद्र जाधव यांच्या डोक्यावर वार केला. तसेच इतर लोकांनी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.