साताऱ्यात सेल्समन म्हणून काम करणारा फिर्यादी गुड्डु सिताराम गुप्ता, वय ३१, रा. राधिका टॉकीज याने संशयित सुनिल सदाशिव रासकर यांना उधारीवर नेलेल्या कपडय़ाचे ३ हजार रूपये परत मागितले.
सातारा : साताऱ्यात सेल्समन म्हणून काम करणारा फिर्यादी गुड्डु सिताराम गुप्ता, वय ३१, रा. राधिका टॉकीज याने संशयित सुनिल सदाशिव रासकर यांना उधारीवर नेलेल्या कपडय़ाचे ३ हजार रूपये परत मागितले. म्हणून सुनिल रासकर याने शिवीगाळ व दमदाटी करायला सुरूवात केली. आणि गुड्डु गुप्ता याला वजनकाटय़ावरील स्टीलच्या प्लेटने मारहाण केली.
या मारहाणीत गुड्डु गुप्ता जखमी झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


