maharashtra

लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार


लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2009 ते 27 जुलै 2022 पर्यंत रवींद्र अंकुश धुमाळ राहणार करंजखोप, तालुका कोरेगाव याने एका महिलेवर विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. याबाबतची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीत आहेत.